जुन्नर (पुणे) : माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रातील बिबट्यांची कोरोना चाचणी होणार आहे.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच हैदराबाद येथे सिंहांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. तसेच दिल्ली येथील सिंहांची चाचणी करण्यात आलेली आहे.
या पार्श्वभूमीवर तालुक्यातील माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रातील बिबट्यांची देखील कोरोना चाचणी केली जाणार असल्याचे संकेत पुणे वनविभागाने दिले आहेत. चाचणीसाठीची पुर्वतयारी देखील करण्यात आल्याचे सुत्रांकडून समजते.