Thursday, August 11, 2022
Homeग्रामीणजुन्नर : छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार आणि जुन्या बसस्थानकाची आमदार बेनके यांच्याकडून...

जुन्नर : छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार आणि जुन्या बसस्थानकाची आमदार बेनके यांच्याकडून पाहणी !

spot_imgspot_imgspot_imgspot_img

जुन्नर / शिवाजी लोखंडे : आज आमदार अतुल बेनके यांनी जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार चौकातील रस्त्याची पाहणी केली.

स्थानिक नागरिकांच्या अनुभवानुसार या ठिकाणी वारंवार अपघातासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार याठिकाणी गतिरोधक टाकण्याच्या सूचना आ. बेनके यांनी बांधकाम विभागाचे अधिकारी तोटावार यांना दिल्या. 

हेही पहा ! माजी आमदार शरद सोनवणे यांचे जनतेला आवाहन !

तसेच जुन्नर शहरातील जुने बस स्टॅन्ड हे दुर्गंधी आणि घाणीने वेढलेले आहे याठिकाणी नवीन आराखडा तयार करून या स्थानकाची पुनर्बांधणी करण्यासाठी बांधकाम विभागाने पुढील आवश्यक पाऊले उचलावीत अशा सूचना अधिकारी वर्गाला यावेळी आ. बेनके यांनी दिल्या.

काहीच दिवसांपूर्वी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे यांनी जुन्नर जुन्या बसस्थानकाच्या दुरावस्थेवरून प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता.

हेही वाचा ! जुन्नर : स्वातंत्र्यानंतर प्रथमच लालपरी जांभूळशीमध्ये दाखल

या पाहणी वेळी नगरसेवक भाऊ कुंभार, भाऊसाहेब देवाडे, आकीफ इनामदार, श्रीकांत जाधव, भुषण ताथेड, बाळासाहेब सदाकाळ, युसुफ शेख, बादशाह तलाव चे उपसरपंच अन्नू पठाण व स्थानिक नागरिक उपस्थित होते.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय