Tuesday, March 18, 2025

जुन्नर : तीन बोकडांवर बिबट्याचा हल्ला, देवराम लांडेंनी घेतली नुकसानग्रस्त कुटुंबाची भेट

जुन्नर / शिवाजी लोखंडे : आदिवासी भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढला आहे. आतापर्यंत जवळपास विविध गावातील तीस ते पस्तीस जनावरे बिबट्याने ठार केली आहेत, त्यामुळे पशुपालन करणारा शेतकरी अडचणीत सापडला आहे.

हेही वाचा ! निघोज प्रकरण तापले, पंचायत समिती सदस्य काळू घागरे व उद्योजक मधुकर रेंगे विरूद्ध गंभीर गुन्हा दाखल

रात्री तांबे गावातील संजय गंगाराम मिंढे यांच्या गोठ्यातील तीन बोकडांवर बिबट्याने हल्ला करुन ठार केले. या घटनेमुळे सदरील कुटुंब अतिशय भीतीच्या छायेत होते. या घटनेची माहिती मिळताच  जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे व अमोल लांडे रात्री ११:३० वाजता घटनास्थळी दाखल झाले व सदरील कुटुंबाची भेट घेतली, तसेच सकाळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडुन जनावरांचा पंचानामा करून, तुम्हाला योग्य अशी मदत शासनाकडून मिळवून देऊ, असे आश्वासन या कुटुंबाला देण्यात आले.

हेही वाचा ! पुणे : जुन्नर तालुक्यामध्ये रोजगार हमी योजना कायद्याची अंमलबजावणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन

त्याप्रमाणे सर्व जनावरांचा पंचानामा वन विभागाच्या मार्फत करण्यात आला व त्यांना लवकरात लवकर शासकीय मदत केली जाईल असे सांगण्यात आले. बिबट्याचे हल्ले होत असल्यामुळे सर्व नागरिकांनी काळजी व सावधगिरी बाळगण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा ! जुन्नर : मृदुला मेहेर शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यात २२ वी

हेही वाचा ! भारतीय रेल्वे उत्तर-पूर्व-सीमा विभाग मध्ये गेटमन पदांच्या एकूण ३२३ जागा

हेही वाचा ! NHPC मध्ये परिक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची उत्तम संधी !

Related Articles

- Advertisement -

Latest Articles