Friday, March 29, 2024
Homeग्रामीणजुन्नर : पंचायत समितीचा गुणवंत 'शिक्षक पुरस्कार' चालू करा - शिक्षक समितीची...

जुन्नर : पंचायत समितीचा गुणवंत ‘शिक्षक पुरस्कार’ चालू करा – शिक्षक समितीची मागणी

जुन्नर : जुन्नर पंचायत समितीचा गुणवंत शिक्षक पुरस्कार चालू करा, अशी मागणी शिक्षक समितीच्या वतीने पंचायत समिती सभापती विशाल तांबे यांच्याकडे करण्यात आली.

यावेळी उपसभापती रमेश खुडे, पंचायत समिती सदस्या मंगल उंडे, काळू गागरे हेही उपस्थित होते.

हेही वाचा ! धक्कादायक : नारायणगाव येथे कचऱ्यात आढळला शस्रक्रिया केलेल्या रुग्णाचा पाय, “डॉक्टर आणि आया” यांचेवर गुन्हा दाखल

पंचायत समितीने कोरोनामुळे  दोन वर्षापासून थांबवलेले पुरस्कार पुन्हा सुरू करावेत, तसेच ऑफलाईन ऑनलाइन मध्ये चांगल्या प्रकारे काम केलेल्या शिक्षकांच्या पाठीवर पंचायत समितीने कौतुकाची थाप टाकावी अशीही मागणी करण्यात आली.

पंचायत समितीच्या मासिक मिटींगमध्ये ह्या विषयाला मंजुरी मिळाली आहे. मागील वर्षाचा व या वर्षाचा असे 2 पुरस्कार एका केंद्रातून दिले जाणार आहेत. लवकरच पुरस्कार कार्यक्रम होणार आहे, असे सभापती  व उपसभापती यांनी सांगितले.

निधनवार्ता : क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांचे निधन !

यावेळी शिक्षक समितीचे अध्यक्ष बाळासाहेब लांघी, सरचिटणीस राजेश दुरगुडे, नेते नामदेव मुंढे, जिल्हा प्रतिनिधी विलास साबळे, उपाध्यक्ष राजेंद्र गारे, शिक्षण सेवक प्रतिनिधी शंकर जढर उपस्थित होते.

हेही वाचा ! जुन्नर तालुक्यात आज ८९ करोना पॉझिटिव्ह


संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय