![]() |
संग्रहित |
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील आदिवासी पेसा ग्रामपंचायती अंतर्गत होणाऱ्या अवैध माती उत्खननाची चौकशी करु दोषींवर कारवाई करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य काळू गागरे यांनी तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेले वर्षापासून कोरोना महामारी मुळे ग्रामसभेस परवानगी नसताना आदिवासी भागातून मोठया प्रमाणात मातीचे अवैध्यरित्या उत्खनन चालू आहे. यामुळे आदिवासी भागाचे निसर्ग सौदर्य, तसेच पर्यावरण धोक्यात येण्याची स्थिती भविष्यात दिसून येत आहे. यावर प्रशासनाचे काहीच नियंत्रण जाणवत नसल्याचे गागरे यांनी म्हटले आहे.
एका मातीचा ट्रक 26 मे 2021 रोजी पलटी झाला. सुदैवाने त्या ठिकाणी कोणतीही जीवीत हानी झाली नाही. परंतु भविष्यात काही जीवीत हानी झाल्यास यांस कोण जबाबदार असणार आहे, असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच सदर प्रकरणांची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी गागरे यांनी केली आहे.