Thursday, August 11, 2022
Homeकोरोनाजुन्नर : सोमतवाडी येथील कोरोना सेंटर राजकारणाचे केंद्र बनतेय का?

जुन्नर : सोमतवाडी येथील कोरोना सेंटर राजकारणाचे केंद्र बनतेय का?

spot_imgspot_imgspot_imgspot_img

जुन्नर : जुन्नर तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत नाही. वाढती कोरोना रुग्ण संख्या आणि अपुऱ्या पडणाऱ्या सोयी सुविधा तसेच आदिवासी भागातील लोकांची होणारी हेळसांड या पार्श्वभूमीवर सोमतवाडी येथील आश्रम शाळेला कोरोना सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आले. या कोरोना सेंटरमुळे पश्चिम भागातील नागरिकांना दिलासा मिळत असला तरी दुसरीकडे या कोरोना सेंटरवर येऊन राजकीय पुढाऱ्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे त्यामुळे हे कोरोना सेंटर राजकारणाचे केंद्र बनतेय का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच कोरोनाने वातावरण ढवळून निघाले असताना कुणी कीर्तन तर कुणी खाद्यपदार्थांची मदत तर कुणी साफ सफाईचे मुद्दे हाती घेताना दिसत आहे.

अशातच सोमतवाडी येथील कोरोना सेंटर वरील राजकीय नेत्यांचा वावर अधिकच वाढलेला दिसतो आहे. या ठिकाणीहुन जे मुद्दे भेटतील त्या मुद्द्यांना घेऊन राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील करताना दिसत आहे. त्यामुळे सोमतवाडी येथील कोरोना सेंटर राजकारणाचे केंद्र बनतेय का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय