Tuesday, April 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

जुन्नर : निमगिरी येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा !

---Advertisement---

---Advertisement---

जुन्नर : लुपीन ह्युमन वेलफेअर एण्ड रिचर्ड्स फाउंडेशन पुणे, ग्रामपंचायत निमगिरी, जागृती महिला ग्रामसंघ निमगिरी आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा साजरा करण्यात आला.

जुन्नर : महिला दिनानिमित्त भव्य संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन, तहसिलदारांच्या हस्ते बक्षीस वितरण

यावेळी लहान मुलींनी सावित्रीबाई फुले, रमाई आंबेडकर, जिजाऊ यांची वेशभूषा केली होती. तसेच यावेळी मिरवणूक काढत लेझीम पथकाने उपस्थितांची मने जिंकली. 

वेबसिरीजवरील अश्लिल चित्रणावर बंधने घालण्याबाबत महाराष्ट्र पोलीसांकडून कारवाई सुरु

तसेच झुंबर साबळे या महिलेने बोलताना सांगितले, महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरला पाहिजे त्यासाठी प्रयत्न करावे. यावर बोलताना जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे म्हणाले, की महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार आहे. २ कोटी रूपयांची पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होईल, असेही लांडे म्हणाले.

महाराष्ट्रातील तीन महिला नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित, राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

---Advertisement---

यावेळी बोलतांना संजय साबळे म्हणाले, आदिवासी भागातील जनतेच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि संस्कृती, परंपरा जपण्यासाठी कला अकादमी स्थापन करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांच्याकडे केली.

यावेळी जाहीर सरपंच अमोल लांडे, माजी सरपंच पोपट रावते, यशवंत डावखर, ग्रामपंचायत सदस्य संजय साबळे, नवनाथ मोरे यांनी संबोधित केले. तसेच सरपंच सुमन साबळे, जागृती महिला ग्रामसंघाच्या अध्यक्ष उज्ज्वला भालेराव, लुपीन फाउंडेशनचे संजय धंदाळे, जोंधळे, पोलिस पाटील ताई साबळे, किरण केंद्रे, रामा साबळे, व्यंकटेश साबळे आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या‌.

कॅन्सर पीडित महिलांच्या उपचारासाठी पुढाकार, तर आरोग्य क्षेत्रातील ‘या’ जागांसाठी होणार लवकरच भरती – आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुळा-मुठा नदीच्या प्रदुषणाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार, असे असेल नियोजन !


Related Articles

- Advertisement -

Latest Articles