अलदरे (जुन्नर) : अलदरे याठिकाणी जेष्ठ नागरिक संघाच्या फलक उदघाटन समारंभ आमदार अतुल बेनके यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
जेष्ठ नागरिकांचे हक्काचे व्यासपीठ आहे. जेष्ठ नागरिक संघ प्रत्येक गावात जेष्ठ नागरिकांना हे व्यासपीठ मिळाले पाहिजे. गावच्या विकासात भविष्यातील वाटचालीत जेष्ठ नागरिकांच्या विचारांचा सन्मान राखला गेला पाहिजे, असे आ. बेनके म्हणाले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अंकुशशेठ आमले, भाऊसाहेब देवाडे, अशोक घोडके, जुन्नर नगरपरिषदेचे नगरसेवक भाऊ कुंभार, निलश रावते, ललित जोशी, दिपक सरजिने, हर्षल जाधव, पोपट महाराज खंडागळे, अलदरे ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते.