जुन्नर / शिवाजी लोखंडे : संयुक्त ग्रामपंचायत चावंड येथे मंगळवार दि.१९ ऑक्टोबर २०२१ रोजी मनरेगाच्या माध्यमातून जल व्यवस्थापन अंतर्गत नाला बांध बंदिस्तीच्या कामाबाबत मार्गदर्शन सभा घेण्यात आली. ग्रामपंचायत चावंड, वनविभाग जुन्नर आणि किसान सभा जुन्नर यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत चावंड येथे नाला बांध बंदिस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहेत.
त्या निमित्ताने वनविभाग जुन्नरचे वनपाल शशिकांत मडके यांनी नाला बांध बंधीस्तीची कामे कशी करावीत या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या सर्वासाठी सरपंच रामा भालचिम, उपसरपंच माधुरीताई कोरडे यांचे विषेश योगदान लाभले.
यावेळी किसान सभा सदस्य कोंडीभाऊ बांबळे, माजी सदस्य जाणकू शेळकंदे, कुकडेश्वर वन धन केंद्र एकनाथ मुंढे, धोंडू बांबळे, शरद लांडे, रोजगार सेवक रोहिदास शेळकंदे, अनंता शेळकंदे, पांडुरंग बांबळे, किसन उतळे, शंकर उतळे, भीमा बांबळे, देवराम मेमाणे, ज्ञानेश्वर उतळे, जिजाबाई भालचिम, आशा शेळकंदे, कासाबाई भालचिम, फसाबाई वायळ तसेच आदी कामगार व ग्रामस्थ उपस्थित होते.