जुन्नर : जुन्नर तालुक्यातील माणकेश्वर गावात आदिवासी जननायक, धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची जयंती 15 नोव्हेंबर रोजी माणकेश्वर ग्रामस्थ व अखिल भारतीय किसान सभा यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली.
जल जंगल जमिनीसाठी लढा देणारे थोर, स्वातंत्रसेनानी, क्रांतिकारक, समाजसुधारक, महामानव भगवान बिरसा मुंडा यांचे कार्य तमाम आदिवासी बांधवांना प्रेरणादायी आहे. अशा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी माणकेश्वर गावचे पोलीस पाटील रोहिदास कोरडे, उपसरपंच माधुरीताई कोरडे, पेसा समन्वयक शेवंताबाई बांबळे, किसान सभा सदस्य कोंडीभाऊ बांबळे, कुकडेश्वर वन धन सदस्य एकनाथ मुंढे, सेवानिवृत्त रामचंद्र कोरडे, प्रगतशील शेतकरी दत्तात्रय लांडे, धोंडू बांबळे, शंकर उतळे, किसन शेळकंदे, धर्माजी कोरडे, सखुबाई लांडे, बबिताबाई बांबळे, हिराबाई दिघे, लहाणाबाई कोरडे, सखुबाई बांबळे आदी महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.