Wednesday, December 11, 2024
Homeजुन्नरJunnar : आपटाळे बीटस्तरीय स्पर्धेत उच्छिल शाळेचे मोठे यश

Junnar : आपटाळे बीटस्तरीय स्पर्धेत उच्छिल शाळेचे मोठे यश

Junnar / आनंद  कांबळे : आपटाळे बीटस्तरीय यशवंतराव चव्हाण कला- क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात भाऊसाहेब बोरा विद्यालय, आपटाळे येथे संपन्न झाला. या बीटस्तरीय महोत्सवाचे उत्कृष्ट आयोजन आपटाळे बीटच्या विस्तार अधिकारी संचिता अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

या सांस्कृतिक महोत्सवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उच्छिल बडबड गीत इयत्ता १ ली व २ री लहान गट प्रथम क्रमांक, कविता गायन मोठा गट प्रथम क्रमांक थाळी फेक व उंच उडी तृतीय क्रमांक स्पर्धेत कु.संध्या दत्तात्रय भालेराव इ.७ वी, उंचउडी मध्यम गट समिर सागर बांबळे इ.४थी पोवाडा गायनात संभव किशोर नवले यांने प्रथम क्रमांक मिळविला तर लोकनृत्य मोठ्या गटात द्वितीय क्रमांकासह अन्य बक्षिसे आणि तृतीय क्रमांक विविध स्पर्धात नाविण्य प्राप्त केले आहे. (Junnar)

उत्कृष्ट परसबाग स्पर्धेत द्वितीय क्रमांक व जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार व तालुका शिक्षक पुरस्कार तसेच अन्य विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहेत. यांसह पाच वर्षात ३० लक्षाहून अधिकची कामे जिल्हा परिषद व विविध सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून झाली आहेत. सन 2024 मध्ये शाळेने जिल्हा अध्यक्ष पुरस्कार व मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा पुरस्काराने सन्मानित केले आहे या पूर्व काळामध्ये उच्छिल शाळेने तालुका व जिल्हास्तरावर लोकनृत्य, कबड्डी, यांसह शिवजयंती महोत्सवात विविध प्रकारचे पारितोषिके पटकावली आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख सुरेश भवारी यांनी केले. इंगळून केंद्राचे केंद्रप्रमुख, संतोष चिलप व अन्वर सय्यद यांनी या नियोजनानुसार संपूर्ण कामकाज पाहिले. सूत्रसंचालन जयसिंग मोजाड यांनी केले.

उद्घाटनप्रसंगी आपटाळे बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी संचिता अभंग व भाऊसाहेब बोरा विद्यालयाचे प्राचार्य बी.के. बांगर व पुणे जिल्हा शिक्षक संघटनेचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी सर्व विजयी स्पर्धकांना सन्मानचिन्ह, पुणे जिल्हा शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष बाळासाहेब लांघी यांनी प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्य शिवाजीराव पाटील गटाचे रमेश सावळे यांनी सर्वांना मेडल दिले. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती अखिल पुणे जिल्हा अध्यक्ष सुभाष मोहरे, पूनम तांबे, तर गुणलेखन व संकलन सचिन नांगरे, तुकाराम वडेकर यांनी केले.तसेच बीटमधील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा व बक्षीसे देण्यासाठी आपटाळे गावचे लोकनियुक्त सरपंच व शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष संदिपभाऊ कोल्हाळ आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते.

उर्वरीत सर्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून बीट मधील सर्व शिक्षक बांधव यांनी कामकाज पाहिले. स्वंयसेवक म्हणून आपटाळे विद्यालयातील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी नियोजनात मदत केली. सर्व स्पर्धक, शिक्षक, पालक स्पर्धा अतिशय उत्साहवर्धक वातावरणात व पारदर्शक पद्धतीने संपन्न झाल्या.

Junnar

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : कुर्ल्यात बेस्ट बसचा भीषण अपघात, 6 ठार, 49 जखमी ; धक्कादायक व्हिडिओ समोर

वडापाव विक्रेत्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास ; आमदार विनोद निकोले यांची प्रेरणादायक कहाणी

लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी होणार ? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती

महिलांना केंद्र सरकारकडून मिळणार 7 हजार रूपये, काय अट आहे वाचा !

पिंपरी चिंचवडमध्ये भंगार गोदामाला भीषण आग, रहिवासी भागात धुराचे लोट

Jio च्या ग्राहकांसाठी खूशखबर : 479 रुपयांत 84 दिवसांचा नवा प्लॅन ; वाचा काय आहे ऑफर

95 विधानसभा मतदारसंघात EVM-VVPAT मशिन्सच्या तपासणीसाठी 104 अर्ज प्राप्त

नेक्स्ट जेनरेशन बजाज चेतक या महिन्यात लाँच होणार, वाचा काय असणार किंमत

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत मोठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय