Tuesday, January 21, 2025

जुन्नर : जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने चार शिक्षकांचा गौरव

जुन्नर : जुन्नर शहरातील सबनीस प्राथमिक विद्यालय प्राचार्य अतुल औटी, काँर्नेल मेमोरियल स्कूलचे मुख्याध्यापक शत्रुघ्न लबडे, अजुंमन प्रायमरी स्कूल च्या मुख्याध्यापिका रेश्मा शेख व प्राथमिक विद्यालय बारव चे मुख्याध्यापक राजेंद्र ढोबळे या शिक्षकांसह सन २०२० – २१ व २०२१ – २२ या दोन वर्षातील सुमारे ५८ शिक्षकांना महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती शाखा पुणे जिल्हा यांच्या वतीने शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर यांचे उपस्थितीत, शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष भरत रसाळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

संघटनेचे महासचिव अंजन पाटील, परीक्षा परिषदेेचे उपायुक्त हारूण अत्तार, पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी केंद्रे यांचे उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला.

       

आयुक्त विशाल सोळंकी व सहसंचालक महेश पालकर, उपसंचालक उकिर्डे, शिक्षणाधिकारी स्मिता गौड यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांना शुभेच्छा पत्राद्वारे व दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देऊन गौरव केला.      

कार्यक्रमाचे नियोजन राज्य उपाध्यक्ष सारंग पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष तथा राज्य कार्याध्यक्ष संतोष शिळमकर, राज्य शिक्षकेतर प्रमुख गुरुबा मोराळे, राज्य सहसचिव धीरज गायकवाड, महिला अध्यक्षा मोरे मॅडम, गुजराती विद्यालय व शैक्षणिक संकुलाच्या मुख्याध्यापिका पटेल मॅडम उपाध्यक्ष शिवाजीराव माने, सचिव श्रीकांत रहाने, तसेच इतर कार्यकर्त्यांनी केले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles