जुन्नर : आज दिनांक 18 नोव्हेंबर 2021 रोजी तहसील कार्यालय, जुन्नर व पंचायत समिती कार्यालय, जुन्नर येथे आजादी अमृत महोत्सव अंतर्गत भगवान मुंडा जयंती निमीत्त आज राजमाता जिजाऊ सभागृह पंचायत समिती जुन्नर येथे दुपारी 3.00 वा. वनहक्क कायदा अंमलबजावणी एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली.
सदर कार्यशाळेत वन हक्क कायदा व वैयक्तीक व सामुहीक वनहक्काचे मार्गदर्शन तसेच सामुहिक वन हक्क दावे मंजूर झालेल्या गावांचे आराखडे तयार करण्यासाठी पुढील दीशा मांडण्यात आली. वैयक्तीक व सामुहीक वनहक्क मान्य झाल्याानंतर महसुल विभाग, ग्रामविकास विभाग, वनविभाग, आदीवासी विकास विभाग, कृषी विभाग ,पशु संवर्धन विभाग व इ. विभागाची भुमीका व विविध विभागाच्या योजना बाबत माहीती देण्यात आली असुन प्रशासन व लोकसहभागातुन वनहक्क प्राप्त गावांचा शास्वत विकास होण्यास अधिक यशस्वी होईल.
याबाबात मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यशाळेचे मार्गदर्शन सामाजिक कार्यकर्ते राजु घोडे यांनी केले.
सदर कार्यशाळेमध्ये तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी वनहक्क कायदया अंतर्गत वैयक्तीक व सामुहीक वनहक्क. धारकांसाठी विविध विभागाच्याा योजना कार्यान्वीत करुन वनहक्क कायदयाची प्रभावी अंतलबजावणी करणेकरीता प्रेरक मार्गदर्शन केले.
तसेच पेसा कायदा वन हक्क कायदा याबाबतचे मार्गदर्शन व विविध योजनांची माहिती गटविकास अधिकारी शरद चंद्र माळी यांनी दिली.
यावेळी कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले नायब तहसीलदार एस. पी. तिटकारे, कृषी अधिकारी बी. ई.रोकडे, विभागीय वन हक्क समिती सदस्या विद्याताई निगळे-जावळे
प्रकल्पस्तरीय सर्व नियोजन व आढावा समिती सदस्य दत्तात्रय गवारी, मिलिंद मडके, पोपट रावते तसेच तालुक्यातील कृषी सहाय्यक, वनक्षेत्रपाल, वनरक्षक आदि सदर कार्यशाळेत उपस्थित होते. तसेच कार्यशाळेचे नियोजन रामदास सुपे (जुन्नर तालुका वनहक्क व्यवस्थापक) तुकाराम लोहोकरे पेसा समन्वयक पंचायत समिती जुन्नर यांनी केले.