Friday, March 29, 2024
Homeग्रामीणजुन्नर : स्वातंत्र्यानंतर प्रथमच लालपरी जांभूळशीमध्ये दाखल

जुन्नर : स्वातंत्र्यानंतर प्रथमच लालपरी जांभूळशीमध्ये दाखल

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे आदिवासी बांधवांनी मानले आभार

जांभूळशी : स्वातंत्र्यानंतर प्रथमच एसटी बस जांभूळशीमध्ये दाखल झाली. याबद्दल आदिवासी बांधवांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष व उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे आभार व्यक्त केले आहेत.

सविस्तर वृत्त असे की, गुरुवार दिनांक २३ सप्टेंबर २०२१ रोजी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सचिव भास्कर कुडळ यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी युवक परिवर्तन प्रतिष्ठान व जांभूळशी कार्यकर्ते संजय कुडळ, सोमनाथ कुडळ, संजय कुडळ, माऊली कुडळ, लकी कुडळ, शंकर कुडळ व आदिवासी सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी साबळे यांनी नरहरी झिरवाळ यांची विधानभवन मुंबई येते भेट घेवून निवेदन सादर करून सविस्तर चर्चा केली.

हेही वाचा ! ‘अजितदादा आमचं ऐका, नाहीतर गडबड होईल’ – शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सूचक इशारा !

ना. झिरवाळ यांनी तात्काळ परिवहन अधिकारी पुणे विभागीय यांना भ्रमणधवनी करून पुढील योग्य कार्यवाही करण्याची सूचना केली. आणि २४ तासात सूत्रे फिरली. ७४ वर्षापासून लालपरी वाट पाहत असलेले आदिवासी बांधव यांना मनस्वी आनंद झाला. आणि अखेर जांभूळशी गावात लालपरी दाखल झाली.  

ना. झिरवाळ यांच्या सोबत या भागतील रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधा यावर सविस्तर चर्चा झाली. तसेच सर्व संबधित विभाग यांना भ्रमणध्वनी करून पुढील कार्यवाही करण्याचा सूचनाही त्यांनी दिल्या.

हेही वाचा ! कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी “या” दिवशी करणार काँग्रेसमध्ये प्रवेश !

अरुंद रस्ता असल्याने दोन ठिकाणी नागमोडी वळणे वगळता बस सुरक्षित हगवणेवस्ती पर्यंत येवू शकते, असे परिवहन बस चालक वाहक आणि अधिकारी यांनी सांगितले. जांभूळशी पर्यंत दिवसातून किमान चार बस फेऱ्या  नियमित चालू करून या भागतील आदिवासी जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

हेही वाचा ! पुणे : माहिती देण्यास टाळटाळ करणाऱ्या ग्रामसेवकांच्याच पाठीशी गटविकास अधिकारी ?

हेही वाचा ! जुन्नर : माणकेश्वर येथे वन धन योजनेची कार्यशाळा संपन्न


संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय