पुणे / शिवाजी लोखंडे : जुन्नर तालुक्याची सुकन्या महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती महिला विभागातर्फे आयोजित केल्या गेलेल्या राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत डॉ. लता पाडेकर यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विजेत्या ठरल्या आहेत.
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात सुप्रसिद्ध अभिनेत्री व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याच्या पुरस्कर्त्या चिन्मयी सुमित राघवन यांनी डॉ. पाडेकर यांचे कौतुक केले.
हेही वाचा ! जुन्नर : मृदुला मेहेर शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यात २२ वी
डाॅ. पाडेकर यांनी ‘परीक्षा सर्पांची आणि स्वतःची’ या डॉ. नरेंद्र दाभोलकर लिखित एका घटनेचे तीन मिनिटांत अभिवाचन केले आणि लगेचच अत्यंत आत्मविश्वासाने आणि समाजहित जपणारे आपले सडेतोड मत मांडले. त्यांच्या या प्रभावी आणि अस्खलित वाचनाचे सर्व परीक्षकांनी कौतुक केले.
निकाल जाहीर झाल्यानंतर त्याच कार्यक्रमात लगेच त्यांचा व्हिडिओसुद्धा पुन्हा सर्वांसाठी दाखविण्यात आला. प्रमुख अतिथी चिन्मयी सुमित राघवन यांनी देखील प्रस्तुत व्हिडिओतील बारकावे आवडल्याचे जाहीर केले.
हेही वाचा ! पुणे : जुन्नर तालुक्यामध्ये रोजगार हमी योजना कायद्याची अंमलबजावणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन
हेही वाचा ! धक्कादायक : जात पाहुन वकिलाला नाकारले घर
हेही वाचा ! नाशिक चलन नोट प्रेस यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४९ जागा
हेही वाचा ! राज्यातील विविध जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा विषय प्रशिक्षक पदांच्या ७० जागा