Sunday, December 8, 2024
HomeNewsजुन्नर : माणकेश्वर येथे कृषीदिनी शेतकऱ्यांनी केले वृक्षारोपण

जुन्नर : माणकेश्वर येथे कृषीदिनी शेतकऱ्यांनी केले वृक्षारोपण

जुन्नर : माणकेश्वर (ता.जुन्नर) येथे महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले ‌‌. या वेळी नारळ, फणस, जांभूळ, चिक्कू, पेरू, हापूस, केशर, पायरी, लंगडा, तोतापुरी, राजापुरी अशा विविध फळझाडांची लागवड केली.

जागतिक तापमान वाढ, बदलते वातावरण आणि वृक्ष संवर्धन आणि संगोपन ही काळाची गरज आहे. तसेच आर्थिक उत्पन्न देण्याचा उद्देश ठेवून सुमारे 10 शेतकऱ्यांनी 451 झाडांची लागवड केली आहे. 

यामध्ये रामचंद्र मुक्ताजी कोरडे (200) रोहिदास कोंडीभाऊ कोरडे (85), धर्मा मुक्ताजी कोरडे (50), कोंडीभाऊ सीताराम बांबळे (30), सागर जाणकू लांडे (30), बाळू कोंडीभाऊ कोरडे (25), धर्मा शिवराम मुठे (15), बाळू जाणकू कोरडे (10), रामदास श्रावण लांडे (6) या शेतकऱ्यांचा समावेश आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय