Sunday, June 8, 2025
---Advertisement---
---Advertisement---

जुन्नर : ईद-उल-अजहा नमाज पठणाचा कार्यक्रम शांततेत संपन्न

Junnar (रफिक शेख) : आज जुन्नर शहरात मुस्लिम समाजाचा पवित्र सण ईद-उल-अजहा मोठ्या श्रद्धा व उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ईदगाह मैदानावर भव्य नमाज पठणाचा कार्यक्रम पार पडला. शहरातील विविध भागातून आलेल्या मुस्लिम बांधवांनी नमाज पठणात सहभाग घेतला आणि एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

---Advertisement---

या नमाज पठणाच्या कार्यक्रमासाठी पोलीस विभागाच्यावतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जुन्नर पोलीस स्टेशनचे अधिकारी डी.वाय.एस.पी. रवींद्र चौधर साहेब, पोलीस निरीक्षक किरण अवचर, उप अधीक्षक भाग्यश्री धीरबस्सी, पोलीस लोहकरे तसेच त्यांच्या संपूर्ण पोलीस पथकाने मैदानावर हजेरी लावून शांतता व शिस्त राखली.

कार्यक्रमानंतर डी.वाय.एस.पी. रवींद्र चौधर आणि पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत सौहार्दपूर्ण वातावरणाचे कौतुक केले. त्यांनी शांतता, ऐक्य आणि सामाजिक सलोख्याचे महत्व अधोरेखित केले.

---Advertisement---

यावेळी माजी नगरसेवक ऍड. जमीरभाई कागदी यांनी पोलीस प्रशासनाचे, उपस्थित नागरिकांचे आणि समाज बांधवांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, “शहरात एकोप्याचे वातावरण टिकवून ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. सर्व धर्मांचे सण शांततेत पार पडावेत यासाठी आपण एकत्र काम करूया.”

Related Articles

- Advertisement -

Latest Articles