जुन्नर : जुन्नर तालुक्यातील घाटघर गावात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती अनोघ्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
कोविड १९ या रोगाच्या प्रादुर्भावामुळे भयभीत झालेल्या सर्व ग्रामस्थांना कोविड १९ बद्दल माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. यामध्ये सोशल डिस्टनसिंग पाळून मास्क व सॅनिटायझरचा वापर करून मोजक्या लोकांच्या उपस्थिती मध्ये एक अनोख्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली. यामध्ये गावातील लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीपर्यंत सर्वांचीच (ताप, ऑक्सिजन लेव्हल, प्लस रेट, सर्दी, खोकला, अंगदुखी) आदी तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी संशयास्पद व्यक्तीची रॅपिड (कोरोना) टेस्ट करण्यात आली.
यासाठी घोगरेवाडी येथील डॉ. जोगदंड, परिचारिका धुळे, आशा वर्कर आस्वले व त्यांचे सहकारी टीम उपस्थित होती. या कार्यक्रमासाठी गावातील सर्व ग्रामस्थांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला व झालेल्या मार्गदर्शनाबाबत खूप समाधान व्यक्त केले.
तालुक्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने अशा प्रकारे जनजागृती व लोकांच्या कल्याणासाठीचा उपक्रम तालुक्यामध्ये राबविला गेल्याने खरोखरच बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यत पोहोचवण्याचे काम घाटघर येथील सम्यक संबुध्द मंडळाने केले आहे.
या कार्यक्रमासाठी मंडळाचे सल्लागार डी आर वारे, मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खरात मंडळाचे विश्वासू नंदूशेठ पानसरे, घाटघर गावचे मुख्याध्यापक गिलबिले, बाळू खरात, अजिंक्य खरात, सुनील खरात, रोहित खरात, महेंद्र खरात, मारुती साबळे, सुरेश रावते, राजू रावते, बाळा शिंदे, बाळू पानसरे , बाळू लोखंडे, युवराज आढारी, पांडू कोकणे, अशोक मुकणे, बाळू साबळे, संजय शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केले.