जुन्नर : स्व. दादाभाऊ मुंढे प्रतिष्ठान. जुन्नर, स्व. विक्रांत केणे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रविण दादाभाऊ मुंढे यांचा 28 फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त जि. परिषद प्राथमिक शाळा राजूर नं 2 आणि जि. प्राथमिक शाळा आंबोली येथील विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
शालेय साहित्य वाटप करते वेळी संदीप मुंढे, अक्षय मुंढे, सागर गेंगजे, गणेश नंदकर, सागर हिले, ओंकार मोहिते, नवनाथ रेंगडे, ऋषिकेश गवारी, सुफियान शेख, अक्षय घोडे, योगेश मुंढे आदी उपस्थित होते. यावेळी पारधी सर आणि तांबे मॅडम यांचे सहकार्य मिळाले.