Thursday, August 11, 2022
Homeकोरोनाजुन्नर : ओतूर येथे मोफत मास्क, सॅनिटायझर व आर्सेनिक गोळ्यांचे वाटप

जुन्नर : ओतूर येथे मोफत मास्क, सॅनिटायझर व आर्सेनिक गोळ्यांचे वाटप

spot_imgspot_imgspot_imgspot_img

ओतूर (जुन्नर) : शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार व शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त आज ओतूर मध्ये मोफत मास्क, सॅनिटायझर व रोगप्रतिकारशक्‍ती वाढीच्या आर्सेनिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.        

शिवसेनेचे जुन्नर तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांच्या हस्ते आज ओतूर मधील पत्रकाराबरोबरच  पोलिस स्टेशन व वन विभागाचे कर्मचारी यांना देखील मास्क, सॅनिटायझर व आर्सेनिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. 

यावेळी शिवसेनेचे पुणे जिल्हा समन्वयक संभाजी तांबे, जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भानुविलास गाढवे, बबनदादा तांबे, सेनेचे माजी विभागप्रमुख ऍड. संजय शेटे उपस्थित होते.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय