Junnar (आनंद कांबळे) : संघर्ष हेच जीवन असून शालेय जीवनात शिस्त बाळगल्यास विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होण्यास मदत होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कौटुंबिक व सामाजिक परिस्थतीबाबत न्यूनगंड न बाळगता शिक्षण घ्यावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते विलास किरोते यांनी केले.
जुन्नर येथील श्री शिवाजी मराठा शिक्षण संस्था शिवनेर संचलित श्री शिवाजी मराठा वसतिगृह येथे विलास किरोते मित्र मंडळ, स्पंद फाउंडेशन व स्व. दिनकरराव कोठारे स्मृती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी विलास किरोते बोलत होते. (Junnar)
यावेळी वसतिगृहातील 120 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते 40 डझन शालेय वह्याचे वाटप करण्यात आले. तर वसतिगृहातील निवासी विद्यार्थ्यांना डिजिटल, प्रबोधनपर व मनोरंजनात्मक शिक्षण मिळावे. या उदात्त हेतुकरिता डिजिटल प्रोजेक्टर भेट देण्यात आला.
यावेळी संचालक रवींद्र पानसरे, तुकाराम महाराज चरित्र अभ्यासक हभप देवराम कोठारे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप चिंचवडे, शुभम भोसले, राष्ट्रीय सेवा दलाचे दत्ताजी डोंगरे, मुख्याध्यापिका संगिता बारवे, अधीक्षक विलास भांबेरे, आनंदा कांबळे, आनंदा मांडवे यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिननाथ पानसरे यांनी केले.
(Junnar)
हे ही वाचा :
मोठी बातमी : माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निधन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संक्षिप्त परिचय
95 विधानसभा मतदारसंघात EVM-VVPAT मशिन्सच्या तपासणीसाठी 104 अर्ज प्राप्त
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
नेक्स्ट जेनरेशन बजाज चेतक या महिन्यात लाँच होणार, वाचा काय असणार किंमत