Tuesday, July 2, 2024
Homeजुन्नरJunnar : इनामवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

Junnar : इनामवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

Junnar/ आनंद कांबळे : उर्मी संस्था पुणे AFINITY X, दुर्ग संवर्धन संस्था व शिक्षक संघाचे सल्लागार आदरणीय संजयभाऊ डुंबरे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इनामवाडी केंद्र आगर तालुका जुन्नर जिल्हा पुणे या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. (Junnar)

आलेल्या पाहुण्याचे सन्मान आकाश सोकसाने, रोहन धावडे, मयुर पोकळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास काळे, यांचे अध्यक्षतेखाली मुख्याध्यापक शांताराम मोधे यांच्या उपस्थितीत सर्व मान्यवर पाहुण्यांच्या व उपस्थितांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

साहित्य मिळाल्याने दिनदुबळ्या गरजवंत मुलांची शैक्षणिक अडचण दूर झाली आता आम्ही अभ्यास करणाराचं असा आत्मविश्वास मुलांनी बोलून दाखविला. पांगरीचे आदर्श शिक्षक हनुमंत गोपाळे यांनी शाळा व शाळेची पार्श्वभूमी पाहुण्यांना अवगत केले. आकाश सोकसाने यांनी मुलांना खूप शिका, मोठे व्हा. तुमच्या अडचणी साठी सदैव आम्ही पाठीशी राहू असे सांगून मुलांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी ग्रामस्थ पालक बहुसंख्येने उपस्थित होते. पालकांनी दिलेल्या साहित्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व संस्थेचे आभार मानले दिलेले साहित्य योग्य वेळेत मुलांना मिळाल्यामुळे वर्षभरासाठी लागणारी गरज पूर्ण झाली व मुलांना खूप आनंद झाला. शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवृत्ती खेमा दिवटे यांनी केले. पाहुण्यांचा सत्कार मुख्याध्यापक शांताराम लक्ष्मण मोधे यांनी केले तर श्रीमती सुमन सखाराम उतळे व अनामिका प्रविण मोढवे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

‘माझी लाडकी बहीण योजना’ महिलांना मिळणार महिना 1500 रूपये; ‘अशी’ आहे अर्ज प्रक्रिया!

Barti : यूपीएससी, एमपीएससीचे मोफत प्रशिक्षण; ‘इतके’ हजार रुपये मिळणार विद्यावेतन

Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत तब्बल 102 जागांसाठी भरती

मोठी बातमी : विराट कोहली पाठोपाठ कर्णधार रोहित शर्माचाही मोठा निर्णय

मोठी बातमी : टी-20 विश्वचषकाच्या विजयानंतर विराट कोहलीची मोठी घोषणा

T20 World Cup : टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय

India Post : भारतीय पोस्ट मध्ये 10वी पाससाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी!

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

ब्रेकिंग : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांना काय दिले वाचा !

बजेट : युवा वर्गासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा !

अजित पवार यांच्याकडून पायाभूत सुविधा आणि अन्य क्षेत्रांबाबत महत्वाच्या घोषणा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय