जुन्नर / आनंद कांबळे : अखिल जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघ नूतन कार्यकारिणीच्या वतीने जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. (Junnar)
या निमित्ताने संघटनेच्या वतीने आमदार महोदय यांच्या विनंतीवरून नूतन संघटना कार्यकारिणीच्या वतीने वह्या पदाधिकारी यांसकडून त्यांना देण्यात आल्या.खरतर जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या यांनी केलेल्या आव्हानाला अखिल शिक्षक संघटनेने प्रतिसाद देत दरवर्षी ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करत असतात व या वर्षी देखील स्व. वल्लभशेठ बेनके यांच्या स्मरणार्थ आमदार महोदय यांनी त्यांचा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचं जुन्नरच्या जनतेला आव्हान केलं व आव्हानाला विनंतीला प्रतिसाद म्हणून नव्यानेच अखिल जुन्नर शिक्षक संघटनेची नूतन कार्यकारिणी 14 जुलै रोजी जाहीर झाली या सर्व पदाधिकारी यांनी त्याला प्रतिसाद देत आज संघटनेच्या वतीने माननीय आमदार महोदय यांना ह्या सर्व सुपूर्त करण्यात आल्या.
याप्रसंगी शुभेच्छा कार्याध्यक्षपदी राजेंद्र बेलवटे कोषाध्यक्ष पपीता हांडे व महिला आघाडीच्या सुमन उतळे नेते भरत रोंगटे यांनी सदिच्छा व शुभेच्छा दिल्या आहेत. या निमित्ताने उपस्थित नूतन अध्यक्ष रविंद्र डुंबरे सरचिटणीस रामदास गवारी तर नूतन राज्य संघटक विवेक हांडे संयुक्त चिटणीस ज्ञानदेव दाभाडे या सर्वांचे आमदार महोदयांनी अभिनंदन स्वागत सत्कार केला व संघटनेच्या पुढील कार्यास मनपूर्वक त्यांना शुभेच्छा दिल्या. (Junnar)
यावेळी उपस्थित जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुभाष मोहरे व अखिल शिक्षक संघटनेचे मार्गदर्शक व सेवानिवृत्त संघटनेचे मार्गदर्शक आनंदा मांडवे, सरचिटणीस तुकाराम हगवणे यांनीही स्वागत व सत्कार केला.


हेही वाचा :
मोठी बातमी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नवीन सहा बदल
मोठी बातमी : टेक ऑफ करताना विमान कोसळलं, १५ जणांचा मृत्यु
अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना
ब्रेकिंग : अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड
मोठी बातमी : अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या दरात मोठी कपात, वाचा किती झाले कमी !
मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी
ब्रेकिंग : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी : MPSC मार्फत सहयोगी प्राध्यापकासह विविध पदांसाठी मुलाखत
मोठी बातमी : संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर, वाचा अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा !
ब्रेकिंग : अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड
गुजरातमधील शाळेच्या पहिल्या मजल्यावरील भिंत कोसळली, धक्कादायक व्हिडिओ समोर