जुन्नर / रफिक शेख : आज पंढरीची वारी. सर्व जण घरातच आहेत. कोरोना महामारीमुळे वारी बंद आहे. लेण्याद्री ता. जुन्नर (जि. पुणे) येथील कोव्हीड सेंटरमधील रुग्णांनी दिंडी काढत हरिनामाचा गजर केला.
यामध्ये गोंविंद ढमाले, प्रहार रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्र चे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण, सिताराम डोंगरे, राजेंद्र धोंडकर, दुराफे महाराज, वरदान शिंदे, संस्कृती शिंदे, डॉक्टर, नर्स आणि स्टाफ सहभागी झाले होते.