Thursday, March 28, 2024
Homeग्रामीणजुन्नर : आदिवासी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर असलेली सावकरीची नावे कमी करण्याची मागणी

जुन्नर : आदिवासी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर असलेली सावकरीची नावे कमी करण्याची मागणी

जुन्नर / शिवाजी लोखंडे : जुन्नर : आदिवासी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर असलेली सावकरीची नावे कमी करण्याची मागणी आदिवासी महासंघाचे अध्यक्ष टी. जे. रावते यांनी तहसीलदार हनमंत कोळेकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी पुणे, कुळकायदा शाखा क्र.पो.ख / कावि / ९३ / २०१९ नुसार दिलेले आदेश, तसेच आंबेगाव व मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना मुळ जमिनी परत देण्याच्या आदेशा प्रमाणे आदेश द्यावेत.

तसेच पुढे म्हटले आहे की, गेली पाच, सहा वर्षापासून पाठपुरावा करत असून कुळकायदा व पेसा कायद्याच्या अधिन राहून आदिवासी भागातील अनेक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बिगर आदिवासी लोकांची नावे सन १९५६ पासून दिसत आहे. सध्या वहिवाट ही आदिवासींची आहे, अशा आदिवासी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आदिवासी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर असलेली सावकरीची नावे कमी करण्याची मागणी केली आहे.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय