जुन्नर (आनंद कांबळे) : 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त संपूर्ण भारतामध्ये स्वच्छता दिवस साजरा केला गेला. या वर्षीची थीम ‘स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता’ अशी होती. या स्वच्छता दिवसाचे औचित्य साधून श्री शिव छत्रपती महाविद्यालय, जुन्नर च्या राष्ट्रीय छात्र सेना विभागा तर्फे जुन्नर(Junnar)शहरात स्वच्छता रॅली काढण्यात आली. अशी माहिती डॉ. कॅप्टन बाबासाहेब माने यांनी दिली. 36 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, पुणे यांचे मार्गदर्शनानुसार या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
रॅलीचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. एम. बी. वाघमारे यांचे हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या उद्घाटन पर संबोधनात एनसीसी च्या छात्र सैनिकांना आपल्या घरापासून स्वच्छतेची सुरुवात करावी, मग आपले गाव व शहर स्वच्छ करावे. तसेच आपला देश स्वच्छ ठेवण्यासाठी निरंतर प्रयत्न करावा अशी अपील केली. या सोबतच त्यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना विस्तृत माहिती दिली.
या प्रसंगी एनसीसी विभाग प्रमुख डॉ. कॅप्टन बाबासाहेब माने, एनएसएस समन्वयक- डॉ. महेंद्र कोरडे, डॉ. सुप्रिया काळे व प्रा. विष्णू घोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर महाविद्यालयातून रॅलीचे मार्गक्रमण सुरु झाले, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जुन्नर बस स्थानक, मार्केट यार्ड, तांदूळ बाजार, परदेशपुरा व परत महाविद्यालय अशा मार्गाने घोषणा देत व लोकांना स्वच्छते विषयी जागृती करत रॅली काढण्यात आली.
यामध्ये एनसीसी चे सिनिअर अंडर ऑफिसर- वैष्णवी मुरलीधर काशिद, ज्युनियर अंडर ऑफिसर – संस्कृत गणेश रसाळ, सार्जंट – विनायक जयकर दातखिळे, कॅडेट्- नेत्रांजली गणेश ताजणे, सीक्यूएमएस- नदीम फिरोज पटेल अशा एकूण 50 छात्र सैनिकांनी सहभाग नोंदविला.
या रॅलीसाठी जुन्नर(Junnar)तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, मा. अॅड. श्री संजय शिवाजीराव काळे, सर्व संचालक मंडळ, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. विलास कुलकर्णी, उपप्राचार्य- डॉ. रवींद्र चौधरी इत्यादी सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा :
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
आमदार अतुल बेनके यांच्या समर्थकांनी घेतली शरद पवारांची भेट, पवारांकडे केली ‘ही’ मागणी
दिवाळीपूर्वीच महागाईचा झटका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर
नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल
अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात उपचार सुरू
मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय, आदित्य ठाकरेंचा दबदबा कायम
महाविद्यालयाच्या आवारात युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा दाखल
मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप
धक्कादायक : सासरच्या लोकांनी घरातच केला गर्भपात, आई आणि बाळ दोघांचा मृत्यू
भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार
अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन न करता पुरण्याचा निर्णय, स्थानिकांचा विरोध
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर