Thursday, October 10, 2024
Homeजुन्नरJunnar : श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून किल्ले शिवनेरीवर स्वच्छता अभियान

Junnar : श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून किल्ले शिवनेरीवर स्वच्छता अभियान

जुन्नर (आनंद कांबळे) : श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह निमित्त व युनेस्को या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या किल्ले शिवनेरी भेटीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राष्ट्रीय छात्र सेना विभागातील ९० स्वयंसेवकांनी वन विभाग, जुन्नर परिक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले शिवनेरीवर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रविवार दि २२ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ०८ वाजता स्वच्छता अभियानास सुरुवात झाली.Junnar

जुन्नरचे तहसीलदार सुनिल शेळके यांनी या अभियानाचे उद्घाटन केले. स्वच्छता अभियानात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तब्बल एक घंटा गाडी भर प्लास्टिक कचरा गोळा करून जुन्नर नगरपालिकेकडे सुपूर्त केला. किल्ले शिवनेरी हे प्रमुख पर्यटन स्थळ आहे, त्यामुळे अनेक पर्यटक गडावरती येत असतात. सोबत आणलेली पाण्याची बॉटल व इतर प्लास्टिकचा कचरा हा इतरत्र टाकला जातो. स्वच्छता मोहिमेमुळे निश्चितच गडाची स्वच्छता होईल व स्वच्छ ठिकाणी पर्यटक कचरा टाकण्यास धजावणार नाही. याचा परिणाम म्हणून येणाऱ्या पर्यटकांकडून भविष्यात प्लास्टिक कचरा हा गडावरती कमी टाकला जाईल व गड स्वच्छ राहील असा विश्वास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महादेव वाघमारे यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमासाठी जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. संजय शिवाजीराव काळे, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. विलास कुलकर्णी, यांचे विशेष सहकार्य लाभले. या अभियानाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. महेंद्र कोरडे, प्रा. डॉ. सुप्रिया काळे, प्रा. मयूर चव्हाण, प्रा. विष्णू घोडे तसेच राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब माने यांनी केले.

Junnar

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

पुणे महापालिकेचा टेम्पो खड्ड्यात कोसळला; पहा थरारक व्हिडिओ

उत्तर प्रदेशात भरधाव बस पलटी; 44 प्रवासी जखमी, एका व्यक्तीचा मृत्यू, पहा व्हिडीओ

भयानक : पुण्यात मध्यरात्री घरात घुसून अज्ञातांकडून धारदार शस्त्राने युवकाचा खून

धक्कादायक : दुचाकी चोरीच्या संशयावरून जमावाकडून तिघांवर हल्ला; एकाचा मृत्यू

मोठी बातमी : संपूर्ण देशात बुलडोझर कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची बंदी, न्यायालयाचे कठोर आदेश

SEXTORTION : एक मोठा सापळा : सौंदर्याचे मृगजळ-वो बोलती है, बुलाती है- ब्लॅकमेलिंग होत आहे का?

आयकर विभागात मोठी भरती; पात्रता फक्त 10वी पास

Konkan Railway : कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरत

संबंधित लेख

लोकप्रिय