Tuesday, April 23, 2024
Homeग्रामीणजुन्नर : बेल्हे प्रादेशिक योजना नव्याने कार्यान्वित होणार, मंत्रालयात बैठक संपन्न

जुन्नर : बेल्हे प्रादेशिक योजना नव्याने कार्यान्वित होणार, मंत्रालयात बैठक संपन्न

मुंबई : बेल्हे प्रादेशिक योजना नव्याने कार्यान्वित होणार असून मंत्रालयात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत बैठक संपन्न झाली. तसेच या बैठकीत तालुक्यातील पाणी पुरवठा विभागाच्या प्रश्नांसंबंधी चर्चा झाली. 

यावेळी आमदार अतुल बेनके, तालुका राष्ट्रवादीचे प्रवक्ते भाऊसाहेब देवाडे, जि.प. सदस्य देवराम लांडे, मारूती वायाळ, आळे गावचे सरपंच प्रितम काळे, उपसरपंच विजय कुऱ्हाडे, जयराम भुजबळ, नवनाथ चौगुले हे उपस्थित होते.

बहुचर्चित आणि गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारी बेल्हे प्रादेशिक योजना कालबाह्य झाली असून हि योजना नव्याने कार्यान्वित करणे, या योजनेसाठी अंदाजपत्रक सादर झालेले असून तांत्रिक मान्यता देखील मिळालेली आहे. त्यामुळे २५ वर्षे जुनी झालेली हि योजना आ. बेनके यांनी मंजूर केली होती व माजी आ. बाळासाहेब दांगट यांचे कार्यकाळात पुर्णत्वास गेली होती. आता या योजनेत नव्याने अनेक गावे समाविष्ठ करण्यात आली असून दोन टप्प्यात असेलली योजना पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध होणे, ग्रा.पं. स्तरावरून १०% लोकवर्गणीची अट रद्द करणे आदी विषयां संदर्भात आज देण्यात आले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय