Thursday, April 18, 2024
Homeजुन्नरजुन्नर : 'हसत-खेळत डासांवर पाळत' जनजागृतीचा कौतुकास्पद उपक्रम - डॉ.वर्षा गुंजाळ 

जुन्नर : ‘हसत-खेळत डासांवर पाळत’ जनजागृतीचा कौतुकास्पद उपक्रम – डॉ.वर्षा गुंजाळ 

आपटाळे विद्यालयात वृक्षारोपण

जुन्नर : मुलांनो, आरोग्याकडे लक्ष द्या, नुकतेच आपण कोरोना च्या महामारीतून बाहेर पडत आहोत. परंतु सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत. सर्दी, खोकला, हिवताप यासारखे संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते, म्हणून काळजी घ्या. हसत-खेळत डासांवर पाळत हा दिलीप कचेरे यांचा जनजागृतीचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार आपटाळे येथे वृक्षारोपण प्रसंगी डॉ.वर्षा गुंजाळ यांनी व्यक्त केले.

आपटाळे (ता.जुन्नर) येथील भाऊसाहेब बोरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात डिसेंट फाउंडेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, आपटाळे व आपत्ती व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समितीच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वर्षा गुंजाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य विषयक व्याख्यान व वृक्षारोपनाचे आयोजन केले होते. यावेळी शालेय व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

या प्रसंगी डॉ.गुंजाळ पुढे म्हणाल्या की डोंगराळ भागातील ही शाळा असून देखील इयत्ता १० वी चा निकाल १०० टक्के लागल्या बद्दल शिक्षकवृंदाचे कौतुक केले. यावेळी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी दिलीप कचेरे यांनी हसत -खेळत डासांवर पाळत या माध्यमातून मुलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.

याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ, प्राचार्य बी.के.बांगर, डिसेंट फाउंडेशन चे प्रकल्प समनवयक फकिर आतार, आपटाळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदिप गोसावी, डॉ.एकनाथ वाघिरे, तालुका आरोग्य पर्यवेक्षक राजेश शेरकर, एकनाथ पारधी, हिंद लॅब समनवयक मंगेश साळवे, प्रशांत कबाडी, राजकुमार चव्हाण, दिपक सांगडे, संकेत बोबले, संदिप कोल्हाल, चैत्राली शेळके ज्योसना चतुर, नम्रता साळवे, शिवाजी सानप आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक फकिर आतार, सूत्रसंचालन संतोष विश्वासराव तर आभार शिक्षक भाऊसाहेब शिंदे यांनी केले. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय