जुन्नर / रवींद्र कोल्हे : नारायणगाव (दि.२८ जुलै ) येथील खोडद रोड शिवारातील रहिवाशी एका महिलेने शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून पाटे – खैरे मळ्यातील एका विहिरीत उडी मारून आत्महत्त्या केल्याची माहिती नारायणगाव पोलिसांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, “खोडद रोड येथील अष्टविनायक सोसायटीतील रहिवाशी राहुल गंगाधर दुशिंग, रुपाली राहुल दुशिंग, प्रवीण गंगाधर दुशिंग, राजश्री प्रवीण दुशिंग, गंगाधर भागाजी दुशिंग ( सर्व रा.अष्टविनायक रेसिडेन्सी,शेजारी खोडद रोड,नारायणगाव ता.जुन्नर जि. पुणे) यांनी अनिता संभाजी पडवळ हिस मारहाण शिवीगाळ दमदाटी करून वेळोवेळी टोमणे मारणे तसेच अनिता हिस मानसिक त्रास दिल्याने त्यामुळे शेजाऱ्यांचा त्रास असाह्य झाल्याने अनिता हिने चिठ्ठी लिहून व कंटाळून घरात काहीही न सांगता घरातून निघून जाऊन पाटे – खैरे मळ्यातील विहिरीत उडी मारून आत्महत्त्या केली.
आत्महत्त्यास वरील पाचही जण जबाबदार असल्याची फिर्याद अनिता यांचा मुलगा विशाल संभाजी पडवळ यांनी नारायणगाव पोलिसांना दिली.
नारायणगाव पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. १४१ /२०२१ भारतीय दंड विधान कलम ३०६, ३२३, ५०४, ५०६ व ३४ कलमान्वये नारायणगाव पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदार पो.नाईक लोंढे यांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गुलाबराव हिंगे पाटील करीत आहेत.