जुन्नर : निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील ३ शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने निमगाव सावा गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत ची माहिती अशी की, निमगाव सावा येथील ओढ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या आनंद गेणभाऊ खाडे (वय.११ वर्षे), साहिल रंगनाथ घोडे (वय.१४ वर्षे) व मयूर रामदास घोडे (वय.१० वर्षे) तिन्ही रा. घोडेमळा, निमगाव सावा. हे तिघेही दुपारी सायकलवरून गेले होते. परंतु उशीरापर्यंत घरी न आल्यामुळे शोधाशोध करण्यात आला.
निमगाव सावा येथील ओढ्याच्या कडेला तिघांची कपडे दिसल्यानंतर ते ओढ्यात पोहण्यासाठी गेले असावेत असा संशय आल्याने पोहता येत असलेल्या लोकांनी पाण्यात उतरून शोध घेतला असता तिघेही आढळून आले. तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेने निमगाव सावा गावावर शोककळा पसरली आहे.