जुन्नर : गेल्या काही दिवसांपासून जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील एसटी बस सातत्याने अचानक बंद केल्या जात आहेत. या बस अचानक बंद केल्या जात असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत.
एसटी महामंडळ आदिवासी भागातील खेड्यापाड्यातील नागरिकांना सकाळच्या वेळी जुन्नर शहरात घेऊन येत आहेत, मात्र नागरिकांना पुन्हा घरी जाताना डिझेल अभावी बस बंद केल्या जात आहे.
आज दुपारी देखील असाच प्रसंग झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत घरी जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. जुन्नरला आलेले नागरिक पुन्हा घरी कसे जाणार असा संतप्त सवाल प्रवाश्यांनी उपस्थित केला.
अचानक बंद केलेल्या बसेमुळे नागरिकांची गैरसोय
पश्चिम आदिवासी भागातील बहुतांश लोक सकाळी लवकर घरगुती कामासाठी जुन्नर येथे येत असतात. अचानक नागरिकांना बस बंद केल्यामुळे गैरसोय होत आहे. अशावेळी खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागतो. बऱ्याच वेळा खाजगी वाहने देखील मिळत नाहीत.
दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे हे देखील जुन्नर बस स्थानकात दाखल झाले होते, त्यावेळी लांडे यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत तात्काळ बसची व्यवस्था करण्यास सांगितले.
सर्वच मुक्कामी बसेस रद्द !
दरम्यान जुन्नर तालुक्यातील सर्वच मुक्कामी बस डिझेल अभावी रद्द करण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
अधिक वाचा :
जुन्नर तालुक्यात आज (२७ जुलै) रोजी आढळले ६३ कोरोनाचे रुग्ण