Thursday, December 12, 2024
Homeताज्या बातम्याVinod Nikole : वडापाव विक्रेत्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास ; आमदार विनोद निकोले यांची...

Vinod Nikole : वडापाव विक्रेत्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास ; आमदार विनोद निकोले यांची प्रेरणादायक कहाणी

Vinod Nikole : डहाणू विधानसभेतून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. वयाच्या 43 व्या वर्षीही साधी राहणी, प्रामाणिक कामगिरी, आणि सामान्यांच्या प्रश्नांसाठी झगडणाऱ्या या आमदारांनी भारतीय राजकारणात नवा आदर्श निर्माण केला आहे.

विनोद निकोले (Vinod Nikole) हे डहाणू तालुक्यातील उर्से गावातील गरीब कुटुंबात जन्मले. त्यांच्या पालकांनी मजुरी करून त्यांना शिक्षण दिलं. घरातील खर्च चालवण्यासाठी विनोद हे डहाणूच्या इराणी रोडवरील वैभव कॉम्प्लेक्सच्या आवारात टपरी टाकून वडापाव आणि चहाविक्री करायचे. आणि त्यांच्या याच टपरीवर चहा-नाश्त्यासाठी माकपचे बुजूर्ग कॉम्रेड एल बी धनगर यायचे. एल. बी. धनगर यांच्याशी झालेल्या संवादातून त्यांचा मार्क्सवादी विचारसरणीशी परिचय झाला. एके दिवशी धनगर यांनी विनोद यांना माकपचं सदस्य करुन घेतलं होतं. तिथेच त्यांची मार्क्सवादी विचारांशी ओळख झाली आणि ते पक्षाचं काम करू लागले.

राज्यातील अनेक कोट्याधीश उमेदवारांच्या पार्श्वभूमीवर विनोद निकोले यांची संपत्ती फक्त 52,082 रुपये आहे, हे उल्लेखनीय आहे. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या या आमदारांनी तळागाळातील लोकांसाठी स्वतःच्या मानधनातून रुग्णवाहिका खरेदी केली. दुर्गम भागांतील रुग्णांना तत्काळ सेवा मिळण्यासाठी ही रुग्णवाहिका त्यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने लोकार्पण केली.

विधानसभेत गंभीरपणे प्रश्न मांडणारे निकोले हे पालघर जिल्ह्यात सर्वाधिक प्रश्न मांडणारे आमदार ठरले आहेत. राज्यातील सर्व आमदारांमध्ये सातव्या क्रमांकावर असलेल्या या आमदारांनी धोरणात्मक चर्चांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

2024 च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार विनोद मेढा यांचा पराभव करत 5,133 मतांनी विजय मिळवून निकोले यांनी सामान्यांच्या पाठिंब्याचा पुरावा दिला. “पैशाच्या जोरावर नव्हे, विचारांच्या ताकदीने लढाई जिंकता येते,” हे त्यांचे विधान त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास उलगडते. विनोद निकोले यांच्यासारखा नेता हेच खऱ्या लोकशाहीचे प्रतीक आहे.

(Vinod Nikole)

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

Jio च्या ग्राहकांसाठी खूशखबर : 479 रुपयांत 84 दिवसांचा नवा प्लॅन ; वाचा काय आहे ऑफर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संक्षिप्त परिचय

95 विधानसभा मतदारसंघात EVM-VVPAT मशिन्सच्या तपासणीसाठी 104 अर्ज प्राप्त

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

नेक्स्ट जेनरेशन बजाज चेतक या महिन्यात लाँच होणार, वाचा काय असणार किंमत

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत मोठी भरती

पुणे येथे विविध पदांसाठी भरती; विनापरीक्षा होणार भरती

संबंधित लेख

लोकप्रिय