Thursday, July 18, 2024
Homeग्रामीणवडवणी रोटरी क्लबच्या वतीने दर्पण दिनानिमित्त पत्रकार सन्मान व पुरस्काराचे वितरण

वडवणी रोटरी क्लबच्या वतीने दर्पण दिनानिमित्त पत्रकार सन्मान व पुरस्काराचे वितरण

वडवणी (लहु खारगे) : रोटरी क्लब ऑफ वडवणी यांच्या वतीने दर्पण दिनाचे औचित्य साधून रविवार (ता.९) रोजी आनंद मंगल कार्यालय येथे तालुक्‍यातील पत्रकारांचा सन्मान व राष्ट्र शिल्पकार पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम पार पडला. 

रोटरी क्लब ऑफ वडवणी यांच्या वतीने आनंद मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने व सरस्वती व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रोटरीचे अध्यक्ष प्रा. सतिषराव भालेराव तर उद्घाटक संतोष मोहिते, प्रमुख पाहणे विश्वबंर वराट, लढा दुष्काळचे प्रमुख राज पाटील हे उपस्थित होते.

वडवणी रोटरी क्लबच्या वतीने सतत तालुक्‍यात विविध सामाजिक कार्यक्रम राबविले जातात, त्यांच्या या सामाजिक उपक्रमांचे सर्व सामान्य जनतेला, सामाजातील सर्व घटकांना आधार मिळतो. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दर्पण दिनाचे औचित्य साधून तालुक्‍यातील सर्व पत्रकार बांधवांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शैक्षणिक कार्यात अत्यंत उत्कृष्ट काम करणारे शिक्षक रविंद्र धर्मराज गायकवाड, प्रकाश कुरकुटे, महादेव लांडगे, अनिता सौदागर, सोनाली देखणे यांना सपत्नीक राष्ट्र शिल्पकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन म्हणून जयदेव लांडे, बाबासाहेब शेंडगे, यांनी तर प्रोजेक्टर को.चेअरमन म्हणून भैरवनाथ शिंदे व डॉ. विजयकुमार निपटे यांनी काम केले. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वडवणीचे अध्यक्ष प्रा.सतिषराव भालेराव, सचिव किसनराव माने, रोटरियन अँड. श्रीराम लगे, सुदाम शिंदे, जयदेव लांडे डॉ. विजयकुमार निपटे, डॉ. दिनकर बोंगाने, गोरख आळणे, अशोक आजबे, आबासाहेब आंधळे, वचिष्ठ शेंडगे, हानेश्वर राऊत, महाविर जगजीवन, माधव पुरी, डॉ.रविंद्र मुंडे, सुनील कुलकणी, श्रीराम शिंदे, सरपंच चंद्रकांत करांडे यांसह इतरांनी परिश्रम घेतले. 

यावेळी या कार्यक्रमाला पत्रकार बांधव, प्रतिष्ठित मान्यवर, शिक्षक, महिला, मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय