पुणे, दि. २६ : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग पुणे आणि आकांक्षा फौंडेशन स्किल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार ५ जुलै रोजी सकाळी १० वाजता रावेत येथील आकांक्षा इंटरनॅशनल स्किल स्कूलमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे (Job Fair) आयोजन करण्यात आले आहे. Pune Job Fair
या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध नामांकित उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला असून त्यांच्याकडून ३ हजारापेक्षा अधिक रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. ही रिक्तपदे किमान १० वी, १२ वी, पदवीधर, कोणत्याही शाखेचा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अभ्यासक्रम (आयटीआय) पूर्ण केलेला, पदविकाधारक, शिकाऊ अभियंता (ट्रेनी इंजिनिअर) अशा विविध पात्रताधारक उमेदवारांतून भरण्यात येणार असून नोकरीइच्छुक उमेदवारांना नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी रिक्तपदांबाबत अधिक माहितीसाठी विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने नोंदवावेत. रोजगार मेळाव्याच्या दिवशी थेट मुलाखतीस येताना आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पारपत्र आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्ज व आधारकार्डाच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात. (Job Fair)
जिल्ह्यातील अधिकाधिक उमेदवारांनी आकांक्षा इंटरनॅशनल स्किल स्कूल, बास्केट ब्रिज जवळ, वॉटर पंपींग स्टेशन, रावेत येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१ रास्ता पेठ, सरदार मुदलीयार रोड, पुणे-११ येथे प्रत्यक्ष अथवा ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे
हेही वाचा :
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) अंतर्गत भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु
BSF : सीमा सुरक्षा दलात 10वी/12वी उत्तीर्णांसाठी भरती
भारतीय सैन्य दल अंतर्गत खेळाडूंसाठी भरती; पात्रता 10वी
बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत मोठी भरती; पगार 64480 पर्यंत
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 214 जागांसाठी भरती
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक अंतर्गत भरती ; 10 वी पास, डिप्लोमा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर अंतर्गत विविध पदांची भरती
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) अंतर्गत भरती
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स अंतर्गत भरती, आजच अर्ज करा
फाल्ता विशेष आर्थिक क्षेत्र अंतर्गत रिक्त पदांची भरती
नाशिक येथे विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे भरती
NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे अंतर्गत भरती
BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत विविध जागांसाठी भरती