नवी दिल्ली : दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात JNU अभाविप तसेच डाव्या विद्यार्थी संघटनांमध्ये पुन्हा संघर्ष झाला. या संघर्षामध्ये काही विद्यार्थी जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठाच्या कावेरी वसतीगृह खानावळीत रविवारी मांसाहारी जेवण तयार केले जात होते. त्याला मज्जाव करण्याचा प्रयत्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविपच्या) कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप डाव्या संघटनांनी केला आहे. तर अभाविपच्या आरोपानुसार याच वसतीगृहात रामनवमीपूजेत डाव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांनी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेत दोन्ही बाजूंकडील सहा विद्यार्थी जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. एकूण सहा विद्यार्थी जखमी झाले आहे. दरम्यान माहराण करणाऱ्या आणि गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी विद्यार्थी संघटनांनी वसंत कुंज पोलीस स्थानकासमोर आंदोलन केलं.
“भाजपचे काही नेते पिसाळलेला कुत्रा चावल्यागत वागत आहेत” – संजय गायकवाड
#WATCH | A group of JNU students reaches the Vasant Kunj North Police Station in Delhi, amid a scuffle that broke out between two groups in the university over allegedly eating non-vegetarian food. pic.twitter.com/gR9A9HALmL
— ANI (@ANI) April 10, 2022
विशेष लेख : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले
डाव्या विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, अभाविपच्या विद्यार्थ्यांनी त्यांना नॉनव्हेज खाण्यापासून रोखले. जेएनयूच्या इतर सर्व वसतिगृहांमध्ये मांसाहार केला जात होता, परंतु केवळ कावेरी वसतिगृहातच या प्रकरणावरून गदारोळ झाला होता. तसेच कावेरी वसतिगृहाच्या मेस सचिवावर प्राणघातक हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे.
जेएनयू कॅम्पसमध्ये डाव्या विद्यार्थ्यांनी गुंडगिरी केल्याचा आरोप अभाविपच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. त्याचवेळी अभाविपच्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, रामनवमीच्या पूजेवरून संपूर्ण वाद सुरू झाला. डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी पूजेला आक्षेप घेतला.
डॉ. अशोक ढवळे यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोवर निवड
संतापजनक ! भाजप आमदाराच्या विरोधात बातम्या दिल्या म्हणून पत्रकारांना पोलिसांकडून नग्न करून मारहाण