(प्रतिनिधी):- केंद्र सरकारने भारताच्या सार्वभौमत्वाला आणि लोकांच्या खासगी आयुष्यातल्या सुरक्षेला धोका असल्याचे कारण देत 59 चिनी कंपनीच्या ऍप वर बंदी घातली. त्यानंतर समाजातून अनेक विविध प्रतिक्रिया येत आहे. अशातच मंत्री जितेंद्र आव्हाड आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही काही प्रश्न उपस्थित केले आहे.
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटले आहे की, तिथे मॅप बदलले जात आहेत, आणि आपण इथे ॲप वर बंदी घालतोय. काय पोरकटपणा आहे! कारण आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे सदस्य आहोत आणि आपण स्वाक्षरी केलेल्या कराराच्या कलम २ आणि १४ (सी) – २ या कलमांनुसार ही बंदी शक्य आहे का ? कशाला ही धूळफेक? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
तसेच, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटले आहे की, “१३० कोटी भारतीयांची खाजगी माहिती धोक्यात आहे म्हणून सरकारने ५९ मोबाईल अॅपवर बंदी घातली. याच निकषावर वापरकर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खाजगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना पाठवणारे NaMo अॅप देखील बंद केले पाहिजे”. असे म्हणत त्यांनी हॅशटॅग वापरून बॅन नमो ऍप असे ट्विट केले आहे.