यवतमाळ : क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १४६ व्या जयंतीनिमित्त कामठवाडा, तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ येथे बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बिरसा क्रांती दलाचे राज्य उपाध्यक्ष म्हणाले, महानायक बिरसा मुंडा यांनी जल, जंगल, जमीनी साठी इंग्रजांविरुद्ध तसेच येथील दीक्कु विरुद्ध लढा दिला. आदिवासी समाजाला स्वातंत्र्याचे भान व आत्मसन्मान, स्वावलंबनासाठी लढण्यासाची त्यांनी प्रेरित केले. इंग्रज सरकार यांच्या विरोधात त्यांनी आंदोलने केली व वेळप्रसंगी सशस्त्र लढा सुद्धा दिला.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी सुभेदार नारायणराव पीलवंड, परशुराम टेकाम, गावचे सरपंच छाया डावरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन गावातील सर्व तरुण युवक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काटमवाडा महादेव आत्राम विवेक विवेक मडावी, सचिन काळे, ऋषिकेश मैघने, संकेत मोकासे, सुरज परचाके, अमित परचाके, संतोष कोटनाके, विजय काळे, सुरेश जांभोरे, विनोद परचाके, विवेक उईके, अक्षय नारनवरे, शुभम कोकांडे, अक्षय टेकाम, अमित गोसावी, यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन कुमारी प्रणिती अगलदरे यांनी केले. गावातील सर्व स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.