Friday, March 14, 2025

जिजामाता बालक मंदिर अंकलखोप मध्ये ऑनलाईन नवगतांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

पलूस (जि.सांगली) : जिजामाता बालक मंदीर अंकलखोप मध्ये सन 2021/22 या शैक्षणिक वर्षामध्ये इ .१ ली साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुगल मिट (Google Meet) द्वारे ऑनलाइन स्वागत समारंभाचे आयोजन  करण्यात आले या कार्यक्रमासाठी पालक व विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक उपस्थित होते. सर्वानी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या व स्वागतही केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक अमोल सूर्यवंशी यांनी कोरोना महामारी रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच पालकांचे, विद्यार्थ्यांचे, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे, शिक्षकांचे आभार सहाय्यक शिक्षक सोमनाथ भालचिम यांनी मानले व हा कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles