मूकं जनावर
पहाट झाली दिशा उजळल्या
लागलो लगबगीनं तयारीला…
बघता बघता लागली आता
तोरणं साऱ्याच्या घराला…
बघा आला सण बेंदराचा
माझ्या मूक्या जनावरांचा…
बघा थाट आता त्यांचा
माझा राजा बैज्या-सर्जाचा…
कुठंन बी बघितलं की
मला बगून हंबरत्यात….
चुकलं जरी कुठं पुन्हा
फिरून दावणीला येत्यात..
लैच नटला माझा बैज्या-सर्जा
घालून गळ्यात घुंगराच्या माळा..
डोक्याला बाशिंग, शिंगात बेगड
गळ्यात कवड्या आणि पायात तोडा..
बघा समदी जनावर नटली
जणू लग्नाला उभा राहिली…
वाजलं ढोल,ताशा,सनई
मिरवणूक गावात आता निघाली…
एकच दिवसाचा सण
किती आनंदात जंगली…
निघून गेला सण आता
पुन्हा त्यांच्याच नादात रमली…
आम्ही कसं फेडू सांगा
तुमच्या दावणीचा उपकार…
मालक नका करू आत्महत्या
आपण समदी मिळून फेडू कर्ज.
तुषार गुळीग, संगोला
☎️ 7219728293