पाऊस
पाऊस गगन भरून येता
सर येते जलबिंदूंची
मन होऊन सुगंधी
पडे ओठावर खळी आनंदाची
पाऊस हा आनंद खरा
भरभरून त्याची मजा घेऊ जरा
वर्षा होता पसरे हिरवळ चहूकडे
दिसे निसर्गरम्य इंद्रधनुचे चित्र सर्वकडे
वर्षा करते जलधारा
बळीराजा होतो पाहून खुश अमृतधारा
वर्षा हे सुख
पाणी हेच जीवन
पक्षी मिसळतात वर्षेत सुर
वर्षधारेत सर्वजण राहु आनंदी
आता पुन्हा महापुर येऊ नये कधी कधी..
कवयित्री -आदिती किरण कुलकर्णी
पत्ता – गावंभाग खाडिलकर गल्ली, सांगली