Sunday, December 8, 2024
Homeग्रामीणजय भीम कॉम्रेड युथ्स धावले भटके विमुक्तांच्या मदतीला !

जय भीम कॉम्रेड युथ्स धावले भटके विमुक्तांच्या मदतीला !

पुर्णा (परभणी) : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे कित्येकांचे हाल होत आहेत. कित्येक जण मृत्युमुखी पडत आहेत तर कित्येकांना उपाशी मरण्याची वेळ आली आहे. मुख्यप्रवाहातील लोकांसाठी ही दयनीय आवस्था असतांना, भटके विमुक्तांचे काय हाल असतील याचा विचार न केलेला बरा, अशा परिस्थितीत जय भीम कॉम्रेड युथ्स मदतीला धावले आहेत. 

भटक्या विमुक्तांना कुठे काम नाही आणि कुणी जवळ येऊ देईल अशी परिस्थिती सुद्धा नाही. देशभरात व राज्यभर त्यांच्यावर आकाश कोसळ्ल्याची परिस्थती निर्माण झाली आहे. अशाच भटके विमुक्तांचा एक जत्था पूर्णा तालुक्यातील चुडावा स्टेशन येथे वस्ती करून राहिला आहे. साधारण 20 ते 25 झोपड्या व त्यात जवळपास 20 कुटुंबे, यासर्व कुटुंबातील एकूण 60 ते 70 लोक राहत आहेत. 

त्यांच्या जगण्या मरण्याचे प्रश्न निर्माण झाले असतांना शासन प्रशासन त्यांची किती काळजी करते हा दूरचा प्रश्न आहे. पण काही स्वयंसेवी संस्था अशा काळात माणुसकी दाखवत पुढाकार घेत आहेत. महाराष्ट्रभर विविध संस्था अशा लोकांना मदत करण्यासाठी पुढे येत असतांना दिसत आहेत. अशातच पूर्णेतील जय भीम कॉम्रेड युथ्स पूर्णा हा समूह यांच्या मदतीला धावून आला आहे. 

या समूहातील नसीर शेख, आंनद वाहिवळ, अमन जोंधळे, अजय खंदारे, जय एंगडे आणि सचिन नरनवरे आदी तरुणांनी, पूर्णेहून धान्याच्या किट्स नेऊन त्या भटक्या विमुक्त जमातीतील 15 कुटुंबाना मदत केली आहे. आणि अशीच मदत करण्यासाठी इतरांनी सुद्धा पुढाकार घेण्याची विनंती केली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय