Tuesday, March 18, 2025

ब्रेकिंग : सर्वच दुकानांच्या नामफलकाबाबत राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

 

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

मुंबई : राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून या संदर्भात महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करण्यात येईल.

कामगार संख्या 10 पेक्षा कमी असलेल्या आस्थापना तसेच 10 पेक्षा अधिक असलेल्या आस्थापना, अशा सर्व आस्थापना, देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करतील. मालक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपीबरोबरच इतर भाषेतही लिहू शकतो. परंतु, मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये. ज्या आस्थापनेत कोणत्याही प्रकारे मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल अशा आस्थापनेस महापुरुष/महनीय महिला यांची किंवा गड किल्ल्यांची नावे देण्यात येऊ नयेत असाही निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा ! प्राध्यापकांसाठी खुशखबर ! ‘या’ महाविद्यालयातील पदे भरणार, राज्य सरकारचा निर्णय !

हेही वाचा ! पुणे जिल्ह्यात पर्यटन स्थळे बंद – जमावबंदीचा आदेश जारी

हेही वाचा ! आदिवासी, दलित शेतकऱ्यांना अमानुष मारहाण केल्याचा डॉ. अजित नवले यांचा आरोप, …अन्यथा तीव्र आंदोलन

हेही वाचा ! पुणे : उद्यापासून किसान सभेचे जुन्नर तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन

Related Articles

- Advertisement -

Latest Articles