Monday, April 28, 2025

ISRO moon mission : चंद्रावर भारताचा ध्वज झळकणार

श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (ISRO) महत्वकांक्षी चांद्रयान 3 साठी मोहीमची तयारी पूर्ण झाली आहे. संपूर्ण जगाचे व देशाचे लक्ष लागलेल्या चांद्रयान 3 चे प्रक्षेपण 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथून दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी होणार आहे.



इस्त्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी या विषयी माहिती प्रसारित केली आहे.हे चांद्रयान-3 23 आणि 24 ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर किंवा परिघात लँडिंग करणार आहे. चंद्रभूमीचा अभ्यास करण्यासाठी 2008 मध्ये चांद्रयान -1 व 2019 मध्ये चांद्रयान-2 मोहीम यशस्वी ठरली नाही.



भारतीय शास्त्रज्ञ अथक परिश्रम घेत असलेल्या चांद्रयान-3 मोहिमेसाठी 651 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. चांद्रयान जेव्हा चंद्रभूमीवर उतरेल तो रोमांचक क्षण भारतीयांना पहावयास मिळणार आहे. स्पेस सेंटर येथे चांद्रयान-3 ची जोरदार तयारी सुरू आहे.

लोणावळा व्हिडिओ : भुशी डॅम ओव्हरफ्लो – चला पर्यटन करू

कोट्यावधी रुपये खर्च करूनही पवना इंद्रायणीला जलपर्णीचा विळखा

महाराष्ट्र : वैफल्यग्रस्त मोदी सरकारने केली लोकशाहीची निर्घृण हत्या

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles