Thursday, October 10, 2024
Homeआंतरराष्ट्रीयमोठी बातमी : इस्रायल मधील भारतीय नागरिकांना अति सावधानतेचा इशारा

मोठी बातमी : इस्रायल मधील भारतीय नागरिकांना अति सावधानतेचा इशारा

Israel of Iran : ईराणच्या इस्रायल वरील बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर राजधानी तेलअवीव मधील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना अति सतर्क राहण्याचा इशारा आणि युद्ध जन्य परिस्थितीत स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.

ऍडवायजरीमध्ये म्हटले आहे की, नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि देशात अनावश्यक प्रवास टाळावा. तसेच सुरक्षा आश्रयस्थानांच्या जवळ राहण्याचा सल्लाही दूतावासाने दिला आहे. याबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी इजरायली अधिकाऱ्यांशी नियमित संपर्कात आहे,” असे दूतावासाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

लेबॉनोन मध्ये आता इस्रायलकडून ग्राउंड ऑपरेशनलाही सुरुवात झाली आहे. इस्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसराल्लाह मारला गेल्यानंतर इराणने इस्रायलवर हल्ल्याची धमकी दिली होती, शिवाय इराणने इस्रायलवर १८० हून अधिक क्षेपणास्त्रे हल्ले करून परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली आहे. इस्रायलमधील भारतीय नागरिकांसाठी ऍडवायजरी जारी केली आहे.त्याचे तंतोतंत पालन करावे, असे म्हटले आहे.

दूतावास इस्रायलमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत असून सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी इस्रायली अधिकाऱ्यांच्या नियमित संपर्कात असल्याचे दूतवासाने ऍडवायजरीमध्ये म्हटले आहे.
सध्या इस्रायलमध्ये ३० हजार भारतीय नागरिक विविध व्यवसाय आणि कामानिमित्त रहात आहेत.
शिवाय दूतावासाने आपत्कालीन स्थितीमध्ये संपर्कासाठी दोन नंबरही जारी केली आहेत.

Israel of Iran

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार

आमदार अतुल बेनके यांच्या समर्थकांनी घेतली शरद पवारांची भेट, पवारांकडे केली ‘ही’ मागणी

दिवाळीपूर्वीच महागाईचा झटका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर

नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल

अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात उपचार सुरू

मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय, आदित्य ठाकरेंचा दबदबा कायम

महाविद्यालयाच्या आवारात युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा दाखल

मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप

धक्कादायक : सासरच्या लोकांनी घरातच केला गर्भपात, आई आणि बाळ दोघांचा मृत्यू

भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार

अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन न करता पुरण्याचा निर्णय, स्थानिकांचा विरोध

मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर

संबंधित लेख

लोकप्रिय