Saturday, October 5, 2024
Homeआंतरराष्ट्रीयIsrael Hezbollah war : हिजबुल्लाहच्या क्षमता नष्ट करण्यासाठी इस्रायलचे लेबनॉनवर...

Israel Hezbollah war : हिजबुल्लाहच्या क्षमता नष्ट करण्यासाठी इस्रायलचे लेबनॉनवर भीषण हवाई हल्ले सुरूच

तेल अविव : पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटानंतर लेबनॉनमध्ये हजारो लोक जखमी झाले 37 जास्त लोक ठार झाल्याची माहिती मिळत आहे. लेबनॉन येथे स्फोटाबाबत एका मोठा खुलासा झाला. हिजबुल्लाहच्या दळणवळण उपकरणांच्या स्फोटात एकूण ८७९ सदस्य मारले गेले आहेत.अशी माहिती मिळाली आहे. (Israel Hezbollah war)


दरम्यान हिजबुल्लाहच्या रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलने राजधानी बैरुत मधील हिजबुल्लाहच्या प्रमुख ठिकाणी इस्त्रायली विमानांनी दक्षिण लेबनॉनमधील गावांवर रात्रभर हवाई हल्ले केले. त्याचवेळी, हिजबुल्लाहच्या अल-मनार टीव्हीने दोन्ही देशांच्या सीमेजवळ पुन्हा हवाई हल्ले सुरू झाल्याचे वृत्त दिले आहे.

शुक्रवारी बैरुतवर केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख कमांडर इब्राहिम अकील ठार झाल्याची माहिती इस्रायलने दिली. बैरुतच्या दक्षिण उपनगरांत इस्रायलने शुक्रवारी जोरदार हवाई हल्ले केले.

हिजबुल्लाहने इस्रायलच्या उत्तर भागांत क्षेपणास्त्रे डागली, १४० क्षेपणास्त्रांपैकी २० क्षेपणास्त्रे मेरॉन आणि नेटुआ भागात डागण्यात आली.

इस्रायल एकाच वेळी विविध विविध फ्रंटवर लढाई लढत आहे. हुथी, हमास, आणि हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनांमुळे इस्रायलने कठोर भूमिका घेतली आहे. उत्तर इस्रायल मध्ये हिजबुल्लाहने रॉकेट हल्ले सुरू केल्यामुळे इस्रायल संतप्त झाले आहे, त्यामुळे हिजबुल्लाहच्या लेबनॉन मधील सीमावर्ती ठिकाणावर इस्रायलचे हवाई हल्ले सुरू आहेत. (Israel Hezbollah war)

मध्यपूर्वेतील तणाव वाढला असून गाझा बेचिराख केल्यानंतर इस्रायलने लेबनॉनवर हल्ले सुरू करून युद्धाची व्याप्ती वाढवली आहे.

हमास आणि इस्रायल यांच्यात अजून युद्धबंदी करार झाला नाही. आम्ही इस्रायलसमोर शरणागती पत्करणार नाही. लेबनॉन मधून गाझातील संघर्षात आम्ही मदत करत राहू, असे हिजबुल्लाहच्या प्रवकत्याने म्हटले आहे.

लेबनॉन आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा इतिहास

लेबनॉन आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष फार जुना आहे, १९४८, १९६५, १९६७, १९७३, १९७८, १९८२, १९८५,१९९३, १९९३, २०००, २००६ असा ११ वेळा संघर्ष झाला आहे.

१९८२ मध्ये इराणच्या सहकार्याने हिजबुल्लाह या राजकीय आणि सशस्त्र गटाची स्थापना झाली. या गटास पश्चिमी देशांनी दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे.

या गटाकडे एक लाख सशस्त्र सैनिक आणि विविध प्रकारची रॉकेट, क्षेपणास्त्रे मोठ्या प्रमाणात आहेत, आणि इस्रायलच्या शहरात त्यांनी अनेक वेळा रॉकेट डागली आहेत. मध्यपूर्वेतील हा संघर्ष सीरिया पर्यंत पसरण्याचा धोका वाढला असून आंतरराष्ट्रीय समुदाय चिंतेत आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय