जेरुसलेम : लेबनॉनमधील दहशतवादी हिजबुल्लाने इस्रायलवर ड्रोन हल्ले केले आहेत. ही अतिरेकी संघटना पुन्हा इस्रायलच्या विरोधात उभी राहिली आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये इसरायलने शुक्रवारी हिजबुल्लाच्या तळावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात रॉयटर्स वृत्तसमूहाचा एक पत्रकार ठार अन्य सहा पत्रकार जखमी झाले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन म्हणाले की, गाझा मधील हमास दहशतवादी ठिकाणे नष्ट करणे आवश्यक आहे परंतु पॅलेस्टिनी जनतेची सुरक्षा अबाधित असणे आवश्यक आहे, गाझावर इस्रायलने पुन्हा कब्जा करणे ही “मोठी चूक” असेल. इस्रायली सैन्याने अतिरेकी गट नष्ट करण्यासाठी ही एक व्यापक लष्करी कारवाई असावी, गाझामध्ये जे काही घडले त्यामागे माझ्या मते हमासचा हात होता आणि हमासचे कट्टरपंथी हे सर्व पॅलेस्टाइन नागरिकांचे प्रतिनिधीत्व करत नाहीत. त्यामुळे इस्रायलने गाझापट्टीवर ताबा घेऊ नका, पुन्हा इस्रायलची खूप मोठी चूक ठरेल,’ असे बायडेन यांनी एका सीबीएस टीव्ही मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे गाझा पट्टीतील 19 कोटी लोकांना या युद्धची झळ बसली आहे. इस्रायल व हमास यांच्यातील बॉम्बफेक रॉकेट्स हल्ले सुरू झालेल्या हल्ल्यात गेल्या आठवड्यात गाझा पट्टीमधील 10 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. 41 किमी लांब आहे आणि 10 किमी रुंद असलेल्या गाझा पट्टीला भूमध्य सागर, इस्रायल आणि इजिप्तनं या भागाला वेढलं आहे. वेस्ट बँक व गाझापट्टी मध्ये इस्रायल असा हा पॅलेस्टाईन प्रदेश आहे. हा वादग्रस्त भूभाग गेली 50 वर्षे युद्धग्रस्त आहे.
सीरिया, लॅबोनॉन मधून हिजबुल्ला, हमास या दाहशतवादी संघटनांना प्रचंड शस्त्रे,आर्थिक मदत असते. लेबनीज अतिरेकी गट हिजबुल्ला आणि उत्तर इस्रायलमधील सशस्त्र सेना यांच्यात झालेल्या गोळीबारामुळे गाझामधील युद्धाची तीव्रता प्रादेशिक पातळीवर पसरू शकते. गाझा मधील जमिनी युद्धामध्ये जीवित, वित्तहानी दोन्ही बाजूला होऊन गल्फमधील तणाव जगाची चिंता वाढवणारा ठरेल,असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
हमासच्या ऑक्टोबर 7 च्या हल्ल्यात 1,400 हून अधिक इस्रायली मारले गेले आहेत तर 3227 जखमी बहुसंख्य नागरिक होते. इस्रायलच्या म्हणण्यानुसार, मुलांसह किमान 155 इतरांना हमासने ओलीस ठेवले आहे आणि गाझामध्ये नेले. 1973 मध्ये इजिप्त आणि सीरिया यांच्यातील संघर्षानंतर हे इस्रायलसाठी सर्वात प्राणघातक युद्ध देखील आहे.
गाझा आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, लढाई सुरू झाल्यापासून 2,670 पॅलेस्टिनी ठार झाले आहेत आणि 9,600 जखमी झाले आहेत, 2014 मध्ये मध्ये इतकी भीषण परिस्थिती सामान्य जनतेची झाली नव्हती. मानवतावादी स्वयंसेवी संस्थाना गाझामधील नागरिकांना मदत पोहोचवण्यासाठी ईजिप्तने सोमवारी दक्षिण गाझामधील रफाहच्या बाहेर सीमा ओलांडण्यासाठी एक करार झाला आहे, असे एका सूत्राने एबीसी न्यूजला सांगितले आहे.