महात्मा फुले यांच्या स्मृती दिनाला जयंती संबोधणाऱ्या प्रमुखाला तात्काळ कारणे दाखवा नोटिस द्या – लोकसेवक युवराज दाखले
पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरीकांच्या सूचनांच्या मदतीने प्रबोधन पर्वाचे आयोजन केले आहे,या संदर्भात सोशल मिडिया व फेसबुकच्या माध्यमातून प्रसिद्ध केले आहे.
या मध्ये 20 नोव्हेबर रोजी सुचना कळवण्यासाठी शेवटची तारीख असं संबोधलं आहे. स्मृती दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाला जयंती म्हटलं आहे. ही अत्यंत चुकीची व कर्तव्यात कसुर करणारी बाब आहे, अशा पद्धतीने चुकीची तारीख प्रसारित करणाऱ्या प्रमुखाला आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस द्यावी, खुलासा मागविण्यात यावा अशी शिवशाही व्यापारी संघ व सकल मातंग समाजाच्या वतीने दाखले यांनी मागणी केली आहे.
महात्मा फुले यांची जयंती 11 एप्रिल रोजी असते,आणि स्मृतिदिन 28 नोव्हेंबर ला असतो हे जनसंपर्क विभाग प्रमुखाला माहीत नाही काय? असा सवाल युवराज दाखले यांनी मनपा प्रशासनाला विचारला आहे.
जन संपर्क विभागाच्या अधिकाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे का?
- Advertisement -