इरबील : इराणच्या हद्दीतून डागण्यात आलेली सुमारे 12 क्षेपणास्त्रे शनिवारी रात्री वायव्य इराकमधील इरबील मधील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाजवळ पडली. इराक आणि कुर्दिस्तान प्रदेशाच्या सीमेबाहेरून पूर्वेकडून 12 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत.
एकापाठोपाठ बारा क्षेपणास्त्र डागण्यात आले. या हल्ल्यामुळे परिसराला आग लागली. सुदैवाने या क्षेपणास्त्र हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
कल्याण – मुरबाड – माळशेज रेल्वे मार्गासाठी लागणारा आर्थिक भार राज्य सरकार उचलणार !
किल्ले शिवनेरीवर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला; २०० पर्यटकांना घेतला चावा
मात्र, दूतावास परिसराचे तसेच परिसराचे आग लागून मोठे नुकसान झाले आहे. हे क्षेपणास्त्र इराणकडून सोडण्यात आले आहेत.
स्थानिक वृत्तानुसार, डागलेल्या क्षेपणास्त्राचे नाव फतह-110 आहे. दरम्यान, अमेरिकन लष्कराने या हल्ल्यावर तात्काळ प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्याचवेळी काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की ही क्षेपणास्त्रे शेजारील इराणमधून डागण्यात आली आहेत.