Friday, May 9, 2025
---Advertisement---
---Advertisement---

IPL 2025 : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर IPL स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

बीसीसीआयचा मोठा निर्णय, उर्वरित १६ सामने लांबणीवर (IPL 2025)

नवी दिल्ली (वर्षा चव्हाण) – भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने (BCCI) एक मोठा निर्णय घेत आयपीएल २०२५ चे उर्वरित सामने अनिश्चित काळासाठी स्थगित केले आहेत. सोमवारी रात्री पाकिस्तानकडून भारतावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर देशात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, त्याचा थेट परिणाम क्रिकेट विश्वावर झाला आहे. (IPL 2025)

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेल्या IPL हंगामातील एकूण १६ सामने बाकी होते. हे सामने आता पुढील सूचनेपर्यंत स्थगित करण्यात आले असून, नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे संकेत दिले गेले आहेत. धर्मशालामधील पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना देखील हल्ल्याच्या रात्रीच अर्धवट थांबवण्यात आला होता.

दरम्यान, भारतीय लष्कराने रात्रभर पाकिस्तानविरोधात प्रत्युत्तरात्मक कारवाई केली. सतत होणाऱ्या सुरक्षेच्या घटनांमुळे बीसीसीआयने प्रेक्षकांच्या व खेळाडूंच्या सुरक्षिततेचा विचार करून स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. (IPL 2025)

याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील रावळपिंडी येथेही ड्रोन हल्ला झाला असून, त्यामुळे PSL (Pakistan Super League) चे सामनेही रद्द करण्यात आले होते. सध्या उर्वरित PSL सामने दुबईत खेळवण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी ही बातमी निश्चितच धक्कादायक आहे, मात्र सुरक्षितता सर्वोच्च असल्याने हा निर्णय योग्य असल्याचे मानले जात आहे.

---Advertisement---

Related Articles

- Advertisement -

Latest Articles